गुहागर : जेसीबी लावून दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची निर्दोष मुक्तता

गुहागर : कोतळुक बौद्धवाडी येथे जेसीबी लावून दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची गुहागर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दि. १९ ऑगस्ट २०२१ रोजी कोतळक बौद्धवाडी येथे राहणारे संदीप तुकाराम मोहिते यांच्या मालकीचे दुकान त्यांचेच नातेवाईक असलेल्या सुगंनदास बुधाची मोहिते व त्यांचे दोन मुलगे गीतेश सुर्गनदास मोहिते आणि प्रवीण सुगंनदास मोहिते यांनी जेसीबी चालवून जमीनदोस्त केल्याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. न्यायालयाने या तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

गुहागर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून या तीनही संशयित आरोपीविरुद्ध गुहागर न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटला गुहागर न्यायालयामध्ये तीन वर्षे चालला. या केसच्या सुनावणी सरकारी पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये जेसीबी चालक नारायण राठोड याची देखील महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली गेली होती. या संपूर्ण केसच्या कामकाजांमध्ये आरोपी यांच्यावतीने अॅड. संकेत साळवी यांनी काम पाहिले. केसच्या अंतिम युक्तीवादावेळी सरकारी पक्षाने सादर केले पुरावे हे पुरेसे नाहीत, आवश्यक त्या गोष्टी शक्य असून सुद्धा सरकारी पक्ष मांडू शकला नाही. जागेचा मालकी हक्क हा आरोपींचाच आहे आणि मुळातच त्या जमिनीवर दुकान अस्तित्वात होते किंवा नाही ही गोष्ट सुद्धा सरकारी पक्ष समोर आणू शकला नाही असा सविस्तर युक्तीवाद आरोपींच्या वतीने केला. त्यामुळे अॅड. साळवी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:41 PM 24/Dec/2024