डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य : रत्नागिरीत २६ डिसेंबरला निषेध मोर्चा

रत्नागिरी : भारताच्या संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याचे पडसाद राज्यभरासह देशभर उमटत आहेत. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वपक्षीय आंबेडकरवादी विचारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रविवार दि. २२ रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सिव्हिल हॉस्पिटल शेजारी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता रत्नागिरी येथे मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीत एल. व्ही. पवार, राजन आयरे, दीपक राऊत, मा. बी. के. पालकर, बशीर मुर्तुझा, अशोक भाटकर, काका तोडणकर, सईद पावसकर, सुधाकर सावंत, शिवराम कदम आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 24/Dec/2024