रत्नागिरी : गोळप येथे आगीत आंबा कलमे होरपळली

पावस : गोळप गार्डीवाडी येथील भागामध्ये २२ डिसेंबर रोजी दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान अचानकपणे त्या परिसरात असलेल्या गवताला आग लागल्याने त्या आगीमध्ये त्या परिसरात असलेल्या आंबा बागायतदार संकेत राडये, संजय राडये व चंद्रकांत सोलकर यांच्या बागांना आग लागल्याने त्या परिसरात असलेल्या गवताने पेट घेतल्याने अंदाजे २५ ते ३० कलमे होरपरळून नुकसान झाले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील गोळप परिसरामध्ये सध्या थंडीची लाट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर येऊ लागला आहे. त्याचबरोबर वाऱ्याचे प्रमाण चांगल्या प्रकारे असल्याने थंडीही चांगल्या प्रकारे जाणवत आहे. असे असताना आंबा बागातदार आंब्यावर येणाऱ्या मोहरामुळे समाधानी असताना त्यातील अनेक हापूस आंबा कलमे मोहरली होती दुपारच्या सत्रात वाऱ्याचा वेग सुरू असल्यामुळे गवताला लागलेली आग तातडीने परिसरामध्ये पसरल्यामुळे या शेतकऱ्यांना त्या बागेमध्ये धाव घ्यावी लागेल अखेर स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने अर्धा पाऊण तासाने आग नियंत्रणात आण्यात यश मिळाले.

त्यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या वर्षी चांगल्या प्रकारे हापूस आंबा कलमे मोहोरत असल्यामुळे या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पन्नाला चांगले वातावरण असताना या आगीमुळे आंबा बागातदार चिंतेत पडले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 24/Dec/2024