राजापूर : जत्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आरोग्य विभाग करणार जनजागृती

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जत्रेमध्ये स्टॉल लावून विविध योजनांची माहिती तसेच भाविकांसाठी प्रथमोपचाराची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात राजापूर तालुक्यातील देवीहसोळ याठिकाणी करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या सूचनेनुसार व तालुका आरोग्य अधिकारी ता. राजापूर- डॉ. बालाजी लोकरे व जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी एन जी बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यादुर्गा यात्रा, देवीहसोळ ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे आर्यादुर्गा देवी यात्रेनिमित्त आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रथोमोपचार व आरोग्यसेवा व सर्व आरोग्य योजनांची माहिती देण्यासाठी प्रा आ केंद्र धारतळे अंतर्गत उपकेंद्र देवीहसोळ चे आरोग्यसेवक मनोज गुरव, अशासेविका सायली नार्वेकर, रेवती भोवड, जि प आरोग्य विभागाचे निलेश विचारे, प्रमोद जोशी आदी कर्मचारी उपस्थित होते.

या आरोग्य प्रदर्शन ठिकाणी जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे आरोग्य योजनाबद्दल माहिती दिली तसेच आरोग्य प्रदर्शनामध्ये आरोग्य योजनांची माहिती पुस्तिका, आरोग्य विभागामार्फत राबविलेल्या उपक्रमाची पुस्तिका तसेच आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या घडीपत्रिका मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आल्या.

याप्रसंगी देवीहसोळ ग्रामपंचायतचे सरपंच रविंद्र पैकडे, ग्रामदेवता श्री आर्यदुर्गा व श्री जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्था देवीहसोळ चे अध्यक्ष रमेश विचारे, सेक्रेटरी अविनाश भोवड, खजिनदार दिनकर विचारे व इतर सदस्य उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी निलेश विचारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 24/Dec/2024