देवरुख : शेतकरी अनेक वेळा बोगस बियाण्यांना बळी पडतो. यामध्ये शेतकरी नुकसानीत जातो. यासाठी मूळचा चिपळूण तालुक्यातील व सध्या संगमेश्वर तालुक्यात वास्तव्याला असलेला उदयोन्मुख शेतकरी साहील गांधी हा शेतकऱ्यांसाठी दूत ठरत आहे. साहील हा शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या भाजीपाला लागवडीची रोपे तयार करून देण्याचे काम करतो. सध्या शेतकरी यांच्या मागणीनूसार कलिंगड, वांगी, मिरची, टॉमेटो व झेंडू या रोपांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. तयार रोपे तीही चांगल्या प्रतीची दर्जाची मिळत असल्याने शेतकरीही साहिलच्या रोपवाटीकेकडे आकर्षित झाले आहेत.

साहिलने स्वतःची जमीन नसल्याने या नर्सरीसाठी साडवली सह्याद्रीनगर येथील पडीक असलेली ६ गुंठे जमीन भाडेतत्वावर घेवून ही रोपे निर्मिती केली आहे. साहिल हा चिपळूण येथील मुळ रहिवासी असून त्याचे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून हॉर्टीकल्चरचे शिक्षण २०२१ साली पूर्ण केले आहे. या नंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. यानुसार दोन वर्षे गुहागर या ठिकाणी शेती व्यवसाय केला. या ठिकाणीही भाजीपाला रोपे तयार करुन शेतकऱ्यांना देत असे. यावेळी मोठ्या प्रमाणात साहिल गांधी संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी या रोपांची खरेदी करत असत. यामुळे साहिलने संगमेश्वर तालुक्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचे निश्चित केले.
गतवर्षी ओझरे खुर्द येथील आत्याच्या पडीक जमिनीमध्ये रोपे निर्मिती करून विक्री करण्याचा व्यवसाय केला. ही जागा कमी पडू लागल्याने व त्याला चांगले व्यावसायिक स्वरूप आणण्याचे उद्देशाने. साहीलने सह्याद्री नगर येथील सहा गुंठे जमीन भाडे तत्त्वावर घेऊन या ठिकाणी रोपे निर्मिती करण्याची नर्सरी उभी केली.
या वर्षी त्यांने कलिंगडाची ५ हजार रोपे तयार केले आहेत. बाहेरुन काळ्या रंगाचे व आतून लाल रंगाची कलिंगडाची जात यामध्ये मेलोडी, अगस्ता व नवीन सिवा जातीची रोपे तयार केले आहेत. ही कलिंगडाची जात आपल्या लाल मातीमध्ये चांगली चव देणारी ठरते. यासाठीच या रोपांची निर्मिती त्यांने केली आहे.
लागवडीसाठी शेतकरी वर्गाने साहिल कडून रोपे खरेदी करण्यास देखील सुरुवात केली आहे. याचबरोबर मिरचीची लांब व हिरवीगार अशी शकिरा जातीची रोपे तयार केली आहेत. वेलवांगी मध्ये ७८६ या जातीची रोपे तयार केली आहेत. याचबरोबर कलकत्ता भगवा झेंडू रोपे व टोमॅटो मध्ये वीरांग जातीची रोपे देखील साहिली गांधी याने तयार केली आहेत.
मिरचीची २ हजार, वांगीची एक हजार, झेंडू कलकत्ता १ हजार व टोमॅटोची ५०० रोपे नर्सरी मध्ये तयार केली आहेत. सध्या शेतकऱ्यांची साहिलकडून रोपे खरेदी करण्याची लगबग सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 24/Dec/2024














