देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज आणि संगमेश्वर तालुका केमिस्ट-ड्रगिस्ट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मासिस्ट दिनानिमित्त देवरूखात जेनेरिक औषधांचा प्रचार व नशामुक्तीवर जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर दोन पथनाट्यही सादर केली. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, साडवली आणि संगमेश्वर तालुका केमिस्ट-ड्रगिस्ट संघटना यांनी ही रॅली काढली.
या रॅलीला देवरूख पोलिस ठाणे येथून प्रारंभ करण्यात आला. यानंतर ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे मातृमंदिर चौक, माणिक चौक, बाजार पेठ, बसस्थानक, स्टेटबँक रोड, मारुती चौकमार्गे पुन्हा पोलिस ठाणे अशी काढण्यात आली. रॅलीमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जेनेरिक औषधांचा प्रचार व नशामुक्तीवर जनजागृतीपर दोन पथनाट्ये सादर केली. या रैलीत फार्मसी कॉलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी व औषध व्यावसायिकही यावेळी उपस्थित होते. रॅलीचे नियोजन व आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे व केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष अभिजित कोळपे यांनी उत्तमरित्या केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 28/Sep/2024