रत्नागिरी : चाफेरी आदर्शनगरमध्ये हातभट्टीच्या दारू विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील चाफेरी आदर्शनगर येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या महिलेविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. तिच्या विरोधात महिला पोलिस शिपाई अन्वी पुसाळकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी संशयित महिला ही आदर्शनगरमधील घराच्या कंपाऊंडमागील झाडाखाली आपल्या गावठी हातभट्टीची ९२५ रुपयांची ९ लिटर दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 25/Dec/2024