खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात काल सकाळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलरवरील अवजड साहित्य रस्त्यावर कोसळून ट्रेलर कलंडला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे चार तास खंडित झाली होती. सुदैवाने, अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
महामार्गावर भोस्ते घाटात काल सकाळी मुंबईकडे जाणारा ट्रेलर कलंडला. ट्रेलरवरील अवजड साहित्य रस्त्यावर कोसळले आहे. गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर या ट्रेलरने अर्ध्यापेक्षा जास्त भाग व्यापलेला होता. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांना घटनास्थळी थांबून वाहतूक नियमन करावे लागले. काही काळासाठी एकाच लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू होती. दोन तासांनंतर क्रेनच्या साह्याने ट्रेलर सरळ करून मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरळीत करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 25/Dec/2024














