देवरूख : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव एक्स्प्रेस, जामनगर एक्स्प्रेस आणि पोरबंदर एक्स्प्रेस या तीन नवीन गाड्यांच्या थांब्याबाबत कोकण रेल्वेकडून अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. गेले वर्षभर निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर फेसबुक ग्रुपने या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. एक्स्प्रेस थांब्यासंदर्भात रेल्वेने ३१ डिसेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा आशयाचे पत्र या संघटनेने रेल्वेला दिले असून, तसे न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार वर्षाच्या शेवटपर्यंत यावर निर्णय न झाल्यास नवीन वर्षाची सुरुवात आंदोलनाने करावी लागणार असल्याचे संघटनेचे प्रमुख संदेश जिमन यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 25/Dec/2024














