समुद्री किनारी वसणाऱ्या बांगलादेशींचा बंदोबस्त करणार; मंत्री नितेश राणेंचा इशारा

मुंबई : मत्स्य आणि बंदर खात्याची जबाबदारी मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी आपल्या पदभार स्वीकारला.

या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. २६/११ नंतर आपण बरीच खबरदारी घेतली. समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचीही बंदोबस्त करणार, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, दि. २४ डिसेंबर रोजी मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी मंत्री नितेश राणे यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच मंत्रालयात तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील दालन क्रमांक २, मंत्रालय मुख्य इमारत या दालनात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी मत्स्य व बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला.

दरम्यान, ना.नितेश राणे यांनी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मत्स्य आणि बंदर खात्यातीतील विविध प्रश्नांवर भाष्य करत उपरोक्त इशारा दिला आहे. समुद्र किनारी रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

मत्स्य आणि बंदरे दोन्ही खात्यांमध्ये काय सुरु आहे? आपण कुठून सुरुवात करायची? याचा मी आढावा घेतल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले. माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने बदल करण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही सूचना दिल्या, असेही नीतेश राणे यांनी सांगितले.

ना.नितेश राणे यांनी पुढे बोलताना, रोहींग्यो आणि बांगलादेशींना इशारा दिला. सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर आपण बरीच खबरदारी घेतली. मात्र आताही काही जिहादी लोकांच्या अॅक्टिव्हिटी सागरी किनाऱ्यावर काम करत असतात, असा दावा नीतेश राणे यांनी केला. त्यामुळे त्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले. रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, त्यांना सोडणार नाही. त्यांची सफाई मोहीम हाती घेऊ. समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचीही बंदोबस्त करणार, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 25-12-2024