रत्नागिरी : तालुका महिला आघाडीच्या वतीने ना. श्री. उदय सामंत ह्यांच्या वाढदिवस निमित्ताने सौ. कांचन ताई नागवेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, आणि उपविभाग प्रमुख ह्यांनी माहेर संस्था निवळी येथे भेट देऊन तिथल्या मुलांना, महिलांना त्यांच्या गरजेच्या वस्तूंचे वाटप आणि खाऊ चे वाटप करण्यात आले.
तसेच मुलांसमवेत श्री. सामंत ह्यांच्या वाढदिवसाचा केक देखील कापला. या सर्वांसोबत थोडा वेळ गप्पा मारून सर्वांना आज खूप छान वाटले, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्या मुलांनी आणि महिलांनी बनवलेल्या सुंदर पर्स देखील त्यांनी खरेदी केल्या. माहेर संस्था मुलांचे आणि महिलांचे खूप छान संगोपन करत आहे. आज सामंत साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना भेटलो. खूप छान वाटले. ह्या साठी श्री. सामंत यांचे खूप खूप आभार आणि श्री. सामंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 26-12-2024









