रत्नागिरी : दिल्लीहून रत्नागिरीतील मालगुंड येथे माताजी निर्मलादेवींच्या सत्संग कार्यक्रमासाठी वृद्ध आले होते. दरम्यान, त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. सुमारास घडली. सत्यवीर सिंग (६४, मूळ रा. वसुंधरा गाझीयाबाद, उत्तर प्रदेश सध्या रा. दिल्ली) असे या मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सत्यवीर सिंग हे दिल्ली येथून मालगुंड येथे माताजी निर्मलादेवी यांच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथील आश्रमात बसलेले असताना त्यांच्या छातीत दुखून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते बेशुद्ध पडले. यावेळी येथील कार्यक्रमातील डॉक्टरही उपस्थित होते. या डॉक्टरांनी त्यांना तपासून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सत्यवीर सिंग यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 26/Dec/2024














