रत्नागिरी : शिक्षण सेवक पद रद्द करून कायम शिक्षक म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी संघटनेने राज्यस्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. या वेळी शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कटिबध्द आहे, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण यांनी दिले.
जुनी पेन्शन संघटनेतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. रत्नागिरी तालुका शाखेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त झालेले माधव अंकलगे यांचा प्रथम सत्कार करण्यात आला. या वेळी अंकलगे यांनी सर्वच नवनियुक्त शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच सेट परीक्षा उत्तीर्ण पेन्शन फायटर पुंडलिक पाटील यांचा सत्कार केला. ऑगस्ट २०२४ मध्ये पवित्र पोर्टल टप्पा २ मधून रत्नागिरी तालुक्यात नियुक्त झालेल्या सर्व नवनियुक्त शिक्षकांचे संघटनेकडून गुलाबपुष्प व छोटीशी भेट वस्तू देऊन स्वागत केले. सर्वांनी स्वतःचा परिचय देऊन संघटनेने आपल्याला हजर होण्यापासून वेळोवेळी केलेल्या मदतीसाठी व हा स्वागत मेळावा आयोजित केल्याबद्दल संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी निरीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे
विद्यमान संचालक अंकुश चांगण उपस्थित होते. शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी आपली संघटना कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रामदास चव्हाण यांनी तर तालुकाध्यक्ष राहुल अलकटवार यांनी सर्वांचे आभार मानले.
पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
रत्नागिरी तालुक्यातून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा रत्नागिरीच्या तालुका कार्यकारिणीत रिक्तपदी तालुका सल्लागार माधव अंकलगे, तालुका सरचिटणीस अवधूत शिंदे, तालुका उपाध्यक्ष सुजित वाफेलकर, तालुका सहसचिव पंकज शिंदे, तालुका संघटक मनोहर इनामे, तालुका प्रसिद्धीप्रमुख रामदास चव्हाण व प्रमोद पाटील, तालुका महिला संघटक स्नेहा ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 26/Dec/2024














