हातखंबा येथे पुलावरून दुचाकी १०० फूट खोल चरात कोसळून स्वार गंभीर

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा झरेवाडी येथे चौपदरीकरणातील पुलावरून १०० फूट खोल चरात कोसळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आझाद अन्सारी (१९, बिहार) असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

अन्सारी हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८ यू ६७७७) वरून पालीच्या दिशेने जात होता. यावेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो पुलावरून थेट १०० फूट चरात कोसळला. सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर अन्सारी बेशुद्धावस्थेत होता. त्याला सकाळी नागरिकांनी पाहिल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रिजच्या खाली खणलेल्या चरात त्याची दुचाकी आदळल्याने तो गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र तो अद्यापही बेशुद्धावस्थेत आहे. त्याची तब्येत गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 26/Dec/2024