पावस : स्वामी स्वरुपानंद यांचा आज जन्मोत्सव सोहळा

पावस : स्वामी स्वरूपानंद यांचा १२२ वा जन्मोत्सव सोहळा शुक्रवारी (ता. २७) होणार असून त्यासाठी पावसनगरी सजली आहे. जन्मोत्सवानिमित्त पावस येथील समाधी मंदिरात २२ पासून उत्सवाला सुरवात झाली आहे. शुक्रवारी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्याची तयारी पूर्ण झाली

असून, भाविकांच्या स्वागतासाठी पावस नगरीत ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेवा मंडळाने केले आहे.

शुक्रवारी सकाळी ९ दिंडी काढण्यात येणार असून, अनंत निवास ते स्वामी मंदिरपर्यंत ही दिंडी वाजतगाजत काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता आरती आणि महाप्रसाद होईल. दुपारी ११ ते १२ या वेळी मी भारतीय (दिर्घाक) हा रवींद्र देवधर यांचा कार्यक्रम, दुपारी १२.३० ते १.३० भरतनाट्यम् हार्दिक संदेश फडके व सहकारी सादर करणार आहेत. दुपारी १.३० ते २.३० संजीवनी गाथेवरील कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० ते ३ या वेळेत कोल्हापूर येथील उत्तरेश्वर भजनी मंडळाचे भजन, दुपारी ३ वाजता वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता जन्माचे कीर्तन अवधुतबुवा टाकळीकर करणार आहेत. रात्री नऊ वाजता प्रथमेश लघाटे यांच्या अभंग गायनाने उत्सवाची सांगता होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 27-12-2024