चिपळूण : तालुक्यात २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेला सुरुवात झाली असून, आतापर्यंत १६६ पैकी ६४ गावातील ८ हजार ६६२ कुटुंबाकडील पशुगणेचा सर्व्हे केला गेला, या गणनेसाठी पाच पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. या सर्वेक्षणात कोबड्यांची संख्या सर्वाधिक आहे. शहरात २० प्रभागांमध्ये ३५१ कुटुंबाकडे झालेल्या पशुगणेच्या सर्व्हेत एकाकडेही पाळीव जनावर आढळलेले नाही.
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दर पाच वर्षांनी राज्यातील पशुगणना करण्यात येते. त्यानुसार २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पशुगणना केली जात आहे, चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने केलेल्या नियोजनानुसार या मोहिमेला सुरुवात झाली, त्यानुसार गाय, म्हैस, वासरे, कोंबड्या, शेळी, मेंढी, आश्व, कुत्री, गाढवे, बदक आदीसारख्या १६ प्रजातींच्या नोंदी केल्या जात आहेत. तालुक्यात १६६ गावे, तर शहरातील २० प्रभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. सद्यस्थितीत ६४ गावे व शहरातील २० प्रभागात पशुगणनेचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी ग्रामीण भागात पाच पर्यवेक्षक व शहरासाठी एक पर्यवेक्षकाची नेमणूक झाली आहे. ६४ गावांमध्ये आत्तापर्यंत ८६६२ कुटुंबांकडील पशुधनाचा साहे करण्यात आला. त्यानुसार गाव गावठी गाय २८२, जर्सी गाय १०८, खिल्लार २. गौर ६१, साहिवाल १६, बैले ५९६. म्हैस १७६, मुरा ५३, जाफराबादी १३, रेडा १२, तसेच शेळ्या तर कोंबड्या १०८२ आवळल्या आहेत. याशिवाय शहरी भागात एकाही कुटुंबाकडे पाळीव जनावरे आढळले नाहीत. पशुसंवर्धन विभागाने याची माहिती दिली आहे.
नागरिकांचे स्थलांतर वाढले
पशुगणनेत गावांची संख्या वाढणार तसतशी पशूंची संख्यादेखील वाढणार आहे. ग्रामीण भागांत रोजगाराची साधने नाहीत. परिणामी स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. विविध कारणांमुळे शहरी भागांत नागरिक स्थलांतरित होत असल्याने शेतजमिनीदेखील ओसाड पडू लागल्या आहेत. परिणामी, शेती निगडित पशुधनदेखील काही प्रमाणात कमी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 27/Dec/2024












