राजापूर : तालुक्यातील आणि शहरातील बेरोजगार युवक, युवतीसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन राजापूर जनजागृती समिती व खादी ग्रामोद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या मेळाव्यात राजापूर तालुक्यातील २५ तर शहरातील १० लाभार्थी उपस्थित होते. पंधरा प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.
हा मेळावा राजापूर शहरात जयप्रकाश नार्वेकर यांच्या निवासस्थानी झाला. यामध्ये छोटे-मोठे उद्योग व्यवसाय रोजगार निर्मिती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्याला खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहून उपस्थिती युवक युवतींना मार्गदर्शन केले. या मेळाव्यामध्ये दहा कर्जदार ६० वर्षापेक्षा जास्त असल्यामुळे ते निकषांमध्ये बसू शकले नाहीत. या
विशेष कार्यक्रमासाठी राजापूर युनियन बँकेचे व्यवस्थापक अनिल कुबटकर, तसेच स्टेट बँकेचे राजापूरचे अजित शिदि उपव्यवस्थापक यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती सुशिक्षित बेरोजगार युवकांना दिली. या वेळी राजापूर अर्बन बँकेचे माजी व्यवस्थापक प्रसत्र मालपेकर, माधवी हर्डीकर यांनी नॅशनल बँकेच्या धोरण, कागदपत्राच्या नीटनेटकेपणा कर्ज व्यवहारात सुलभता आणावी असे आवाहन करण्यात आले.
तसेच जयप्रकाश नार्वेकर यांनी युवकांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. यावेळी प्रतिभा मराठे, प्रकाश बावळे, नित्यानंद पाटील, अरविंद लांजेकर, प्रसत्र विनायक मालपेकर उपस्थित होते. यानंतर येत्या मार्चपूर्वी असा मेळावा मातोश्री हॉलमध्ये घेण्याचे ठरले उपस्थितीने नारळीकर यांचा कार्यक्रमाबद्दल कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 27/Dec/2024














