खेड : मनसे व राजवैभव प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खेडचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. या ठिकाणी फुले, दुर्वा, पेढे, प्रसाद न वाहता शैक्षणिक साहित्य अर्पण करावे, असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस अॅड. वैभव खेडेकर यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गणेशोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
‘खेडचा राजा’ दर्शनासाठी गणेशभक्तांची रिघ लागत आहे. खेडच्या राजाला गणेशभक्तांकडून नवसही केले जातात. दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांकडून दुर्वा, पेढे, प्रसादाचा नैवेद्य दाखवला जात आहे. भाविकांनी दुर्वा, पेढे, प्रसादाचा नैवेद्य न दाखवता शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाला गणेशभक्तांकडूनही प्रतिसाद लाभत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 17-09-2024