रत्नागिरी : दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी शासकीय जलतरण तलाव साळवी स्टॉप येथे उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री.किरण सामंत यांनी श्रीफळ वाढवून तसेच फ्लैग ऑफ करून केले. उद्घाटन प्रसंगी आमदार किरण शेठ सामंत यांनी उपस्थित जलतरणपटूना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. तसेच जलतरण तलावासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून 100 पेक्षा जास्त जलतरणपट्टू सामील झाले होते. सदर स्पर्धेचे आयोजन श्री.विवेक विलणकर यांनी रत्नागिरी जिल्हा जलतरण असोशियेशनच्या माध्यमातून केले. तसेच सदर स्पर्धेला उद्घाटन प्रसंगी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी चे श्री.ओठवणेकर, शहरातील नावाजलेले बिल्डर नित्यानंद भुते, उदयोजक ओंकार मोरे, रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशन चे अध्यक्ष मनोज साळवी व सेक्रेटरी मनीषा ताई बेडगे तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना चवंडे, भाजप जिल्हा चिटणीस उमेश कुलकर्णी, कोकण कोस्टल मॅरेथॉन टीम हे मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेमध्ये ग्रुप चॅम्पियनशिप खालीलप्रमाणे —अंडर 10—कृष्णा पखाले मुलीमध्ये मध्ये माही कदम, अंडर 12 मध्ये कनिष्क घाग मुलीमध्ये निधी भिडे, अंडर 14 आयुष काळे मुलीमध्ये —निधी भिडे अंडर 17 मुलांमध्ये आयुष काळे व मुलींमध्ये आरोही पालखडे, अंडर 19 सोहम मंजुळे व मुलीमध्ये तन्मयी जाधव स्पर्धाकांनी वैयक्तिक बक्षीस संपादन केले.
सदर मुलांचे मान्यवरांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. सदर स्पर्धेसाठी कोकण कोस्टल मॅरेथॉन टीम प्रसाद देवस्थळी, डॉ.नितिन सनगर, महेश(बॉबी)सावंत, समीर धातकर तसेच पालक श्री.मंजुळे, यश देवदास, सौ.पाटील मॅडम, वाघाटे मॅडम, पखाले मॅडम, शेट्ये मॅडम यांनी व्यवस्थिपणाला खूप मदत केली. तसेच डेरवण च्या विनायक पवार सरांनी स्पर्धेमध्ये स्टार्टर ची मुख्य भूमिका पार पाडली. या सर्व मान्यवरांचे विवेक विलणकर यांनी आभार मानले व यापुढील सर्व उपक्रमाना असेच सहकार्य मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 27-12-2024











