मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त हातखंबा गावातील शाळेत खाऊ वाटप

पाली : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हातखंबा, बोंबलेवाडी, तारवेवाडी, डांगेवाडी या जि.प. प्राथमिक शाळेतील मुलांना हातखंबा येथील शिवसेना व युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच जितेंद्र तारवे, महिला विभाग प्रमुख विद्याताई बोंबले, उपविभाग प्रमुख प्रमोद डांगे, युवासेना विभाग प्रमुख अ‍ॅड. सुयोग कांबळे, युवा नेतृत्व ग्रा.पं. सदस्य विलास बोंबले, रश्मिता बोंबले, शाखाप्रमुख संजय भुते, विशेष कार्यकारी अधिकारी दीपक डांगे तसेच रविंद्र चव्हाण उपस्थित होते. या वेळी हातखंबा गावातील सर्व शाळेतील मुलांनी मंत्री उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 27-12-2024