रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात शिवसेना ( ऊबाठा ) गटाला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती संजना माने यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संजना माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ( ऊबाठा ) गटाच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता.या परभावानंतर पक्षांतर्गत धुसफूस समोर आली. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर अनेकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. अशातच रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती यांनी रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्व स्वीकारत भाजप मध्ये प्रवेश केला. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी वाटद जिल्हा परिषद गटातील मधील शिवसेना उबाठा गटाचे विभाग अध्यक्ष श्री. उदय माने यांच्या समवेत अनेक प्रमुख कार्यकर्ते यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.
तालुका अध्यक्ष श्री.विवेक सुर्वे यांच्या साथीने विकासकामे करून पूर्ण करणार असू. जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकास कामे आणि भाजप पक्षवाढी साठी प्रयत्न करणार असल्याचे माजी सभापती सौ.माने यावेळी म्हणाल्या.
जिल्हा परिषद गटात शत प्रतिषत भाजप करण्याचा आपला मानस असून आगामी निवडणुकीत भाजपा पक्षात अनेक गावातील कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे विभाग भाजपा विभाग अध्यक्ष श्री.निखिल बोरकर यांनी यावेळी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:27 27-12-2024