संगमेश्वरातील बहुरंगी नमनाचे मुंबईत एकाच दिवशी दोन प्रयोग

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील अशोक दुदम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना घेऊन स्वतः नमन मंडळ सुरू केले आहे. या नमनाचे वैशिष्ट्य म्हणजे ७० एम एमचा स्क्रीन लावला जातो. अशा या बहुरंगी नमनाचे मुंबई शहरामध्ये एकाच दिवशी दोन प्रयोग होणार आहेत.

नमन ही खास कोकणातील लोककला. सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी हमखास सादर होणारे नमन आता थेट मुंबईत सादर होणार आहे आणि ते ही नाट्यगृहात. गोळवली येथील अशोक दुदम यांच्या प्रयत्नातून हे शक्य होणार आहे. भारुड, जाखडी, खेळे हे खास कोकणातील लोककलेचे प्रकार आहेत. त्यापैकी एक कला म्हणजे नमन, पूजेच्या ठिकाणी देवाला केलेले वंदन म्हणजे नमन अशा अर्थाने नमन हा शब्द असावा असे अनेक जाणकार सांगतात.

अशोक दुदम लोकनाट्य नमन मंडळाचे २९ डिसेंबर रोजी एकाच दिवशी दोन प्रयोग साहित्य संघ नाट्यगृहात दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७.३० वा. असे दोन प्रयोग सादर करणार आहेत. रुपेश दुदम लिखित कोकणातील जमीन मालकांनी जमीन विकू नये, यावर समाजप्रबोधन करणारे वघनाट्य लालमाती हे सादर केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 27/Dec/2024