लांजा : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सूचनेनुसार लांजा तहसीलच्या वतीने सुशासन सप्ताह साजरा करण्यात आला. या सुशासन सप्ताहामध्ये ६५६ ऑनलाईन नोंदणी दाखले, रेशन कार्ड आणि प्रशासकीय मार्गदर्शन करून समस्यांचे निराकरण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार प्रियांका ढोले, नायब तहसीलदार अनिल गोसावी, सुरेंद्र भोजे आदी उपस्थित होते. सार्वजनिक परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने खऱ्या अर्थान सप्ताह लोकाभिमुख राबविण्यात आला. लांजा तालुक्यात तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कार्यालयात सुशासन सप्ताह साजरा करताना सुशासन सप्ताहामध्ये वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र १०, उत्पन्न दाखले ३२, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र ११९, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ११, अधिकारी अभिलेखाचे प्रामाणिक प्रत ५१, अल्पभूधारक दाखला शेतकरी असल्याचा दाखला १, डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र १, प्रतिज्ञापत्र व साक्षांकित करणे १५७, सातबारा, आठ-अ, फेरफार ऑनलाईन प्रत पुरविणे २७०, संजय गांधी निराधार अनुदान योजना ५, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना ४ व ५ शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले ग्राहक रेशन दुकानदार, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
तहसील कार्यालय परिसराची स्वच्छता
या सप्ताहाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता केली. महसूल विषयक सर्व बाबींचे प्रशिक्षणही झाले. यावेळी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. ग्राहकदिनही साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत व रेशन दुकानदारांच्या अडीअडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 27/Dec/2024














