गळफास घेतलेल्या राजीवडा येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथे गळफास घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मासुम अजगर दर्वेश (२४, रा. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.

मासुम अजगर याने २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राजीवडा येथे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल केले.

गळफास घेतल्याने प्रकृती गंभीर असलेल्या मासुम याच्यावर अतिदक्षता विभाग येथे उपचार करण्यात येत होते.

रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मासुम याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 28/Dec/2024