रत्नागिरी : सोमवार दिनांक 30/12/2024 रोजी रत्नागिरी नगर परिषद पाणी पुरवठा विभाग योजनेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
याची सर्वांनी नोंद घ्यावी.व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे, अशी विनंती नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शीळ धरण येथील जॅकवेल मधील गाळ काढण्याचे काम यादिवशी केले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 28-12-2024













