पुणे : राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे पहिला हप्ता केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर या योजनेसाठी लागणार्या निधीवरून विरोधक सत्ताधारी पक्षावर आरोप करीत आहेत.
या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोप दरम्यान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या पुणे दौर्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अनेक घडामोडींबाबत भाष्य केले.
लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांना केव्हा दिला जाणार आहे याबाबत महिलांकडून विचारणा होत आहे. तर दुसर्या बाजूला या योजनेमुळे शिक्षकांचा पगार होण्यास उशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या प्रश्नावर आदिती तटकरे म्हणाल्या की, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असून महिला बालविकास विभागाला इतर कोणत्याही खात्याचा निधी वळविण्यात आलेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:00 28-12-2024