संगमेश्वर शास्त्री पुलावर वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल येथे मागील काही दिवसांपासून ट्रॅफिक जाम ची समस्या भेडसावत आहे. सध्या नववर्षाच्या स्वागताला आणि नाताळच्या सुट्टीनिमित्त मोठ्या संख्येने पर्यटक याच मार्गावरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कडे जात आहेत. संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व वाहतूक सध्या जुन्याच अरुंद असणाऱ्या पुलावरून सुरू आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची देखील नेमणूक करण्यात आली आहे मात्र तरी देखील बेशिस्त पणे घुसणाऱ्या वाहनांमुळे ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.