गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील मिनीसरस प्रदर्शानाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
गणपतीपुळे येथील गणपती मंदिर परिसरातील असलेल्या देवबागेमध्ये ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शन २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ २८ रोजी दुपारी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. परंतु भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याकारणाने या ठिकाणी दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यामुळे या सरस प्रदर्शनाचे थाटामाटात होणारे उद्घाटन रद्द करण्यात आल्याची माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जि.प. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग स्तरीय व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील एकूण ७५ स्टॉल सहभागी झाले होते. त्यात महिला बचतगटांच्या उत्पादनांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 30/Dec/2024














