रत्नागिरी : जिल्ह्यात क्षयरुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये तपासणीच्या दरम्यान ७५२ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी तीन जणांना टीबी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यामध्ये २३ डिसेंबर २०२४ ते ०३ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये अतिजोखमीच्या भागामध्ये क्षयरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अतिजोखमीच्या भागात म्हणजे झोपडपट्टी, वीटभट्टी, भटक्या जमाती, स्थलांतरित लोक, खाण कामगार वस्ती, रस्ते व इमारती बांधकाम कामगार, बेघर व्यक्ती,
तुरुंग, वृद्धाश्रम, आश्रमशाळा, मनोरुग्णालय व वसतिगृह या ठिकाणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी फिरून क्षयरुग्ण शोध घेत आहेत. संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेतले जात आहेत.
त्यानंतर त्या रुग्णांचे एक्स-रे काढून घेतले जात आहेत. अशा रीतीने जिल्ह्यात क्षयरुग्णांची शोधमोहीम सुरू असून, ही मोहीम आणखी तीन जानेवारीपर्यंत चालणार आहे. जिल्ह्यात २ हजार २०० क्षयरुग्ण आहेत. त्यांच्यावर मोफत वैद्यकीय उपचार केले जात आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत घरोघरी क्षयरुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 30/Dec/2024














