खेड : खेड तालुक्यातील निगडे येथील वेंदात हॉटेलमध्ये दि. २७ डिसेंबर रोजी मारहाणीची घटना घडली. गोवा येथून आलेल्या पर्यटकांनी भाकरी देण्यास उशीर झाल्यामुळे हॉटेल मॅनेजर जितेंद्र रसाळ यांच्यावर हल्ला चढवला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून एक गट पर्यटक जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी अतिरिक्त भाकरीची ऑर्डर दिली होती. मात्र, भाकरी शेकण्यात उशीर झाल्यामुळे पर्यटकांना राग आला. त्यांनी हॉटेल मॅनेजर रसाळ यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. यामध्ये रसाळ यांना मुक्कामार झाला, तर हॉटेलमधील फर्निचरही तुटले. या प्रकरणी रसाळ यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या शोधास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे खेड परिसरात खळबळ उडाली आहे. पर्यटकांनी अशा प्रकारे वागणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 30/Dec/2024














