खेड : भरणे नाका येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी

खेड : भरणेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबई गोवा महामार्गापेक्षा अधिक उंचीवर उभारण्यात यावा, अशी मागणी येथील शहर मराठा सेवा मंडळाने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा खेड भरणे येथे उभारण्यात आलेला अश्वारूढ पुतळा आहे. परंतु हा पुतळा मुंबई-गोवा महामार्गाच्या उंचीपेक्षा कमी उंचीचा असल्याने महामार्गावरून जाणारी अवजड वाहने व त्यांची धूळ, चिखल यामुळे या पुतळ्यावर सातत्याने घाण उडत असल्याने याकडे लक्ष वेधले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:01 17-09-2024