रत्नागिरी : कोणत्याही सामाजिक क्षेत्रात वावरण्यासाठी मनुष्यामध्ये एक विशिष्ट स्वभाव असावा लागतो. सध्याच्या जगासमोर पर्यावरणीय संकट दूर सारण्याचे मोठे संकट आहे. त्यासाठी पर्यावरण जनजागरण, संवर्धन आणि संस्कार निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले.
भारतीय वनस्पतींचा चालताबोलता माहितीकोश अशी ओळख असलेले ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आयोजित आठवे पर्यावरण संमेलन आळंदीतील देवीदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर येथे नुकतेच झाले. त्यावेळी वाटेकर बोलत होते. संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातून राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, जिल्हाध्यक्ष सतीश मुणगेकर, सौ. मायावती शिपटे, श्रुतिका आखाडे, शैलेजा आखाडे यांच्यासह राज्यातील २१ जिल्ह्यातील २०० पर्यावरणप्रेमी उपस्थित होते
संमेलनाध्यक्ष प्रा. महाजन यांची दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला संमेलनाचे उद्घाटन श्री शामेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे (देवाची) प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे पर्यावरण सल्लागार आणि ज्येष्ठ शास्वज्ञ (नि.) डॉ. प्रमोद मोघे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी अॅड. प्रभाकर तावरे, धर्मशाळेचे अध्यक्ष निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या उपस्थितीत झाले.
१९८२ पासून मंडळाचे काम सुरू
खरंतर निसर्गाचं स्वयंव्यवस्थापन हे व्यवस्थापनशास्त्राचं सर्वोत्तम उदाहरण आहे. मनुष्याच्या लुडबुडीमुळे पर्यावरणाचं व्यवस्थापन बिघडलं आहे. माणसांनी पर्यावरणाच्या शिस्तबद्ध चाकोरीमध्ये लुडबूड करून निमर्माण केलेल्या अडथळ्यांची दुरुस्ती करायला हवी आहे. ही दुरुस्ती करण्याचे काम अनेक मंडळी आपल्यापरीने करत आहेत. अशा तज्ज्ञांचा विचार उद्याच्या पिडीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात एक व्यवस्था उभी करण्यासाठी वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांना झाली होती. त्यातून मंडळाचे काम उभे राहिल्याचे या वेळी सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 PM 30/Dec/2024














