दापोली : दापोली- मुरुड-हर्णे या पर्यटन मार्गावर चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दि. ३० रोजी सायंकाळी हा अपघात झाला. या वेळी दुचाकीस्वार याला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातामुळे या ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून आली. नववर्ष स्वागतासाठी दापोलीत रोज हजारोंच्या संख्येने पर्यटकांची वाहने येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका दापोलीत वाढला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:51 AM 31/Dec/2024














