मनसे चिपळूण शहराध्यक्ष अभिनव भुरण यांचा तडकाफडकी राजीनामा

चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून चिपळूण शहरासह तालुक्यात महाराष्ट्र अभिनव भुरण नवनिर्माण सेनेचे प्रभावी काम करणारे शहराध्यक्ष अभिनव भुरण यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. येथे मनसेचे जोरदार काम करूनही पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळाले नाही. क्षमतेनुसार आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत भुरण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चिपळूणचे शहराध्यक्ष राहिलेले अभिनव भुरण यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वरिष्ठ स्तरावरील अंतर्गत राजकारण आणि दबाव यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. भुरण यांना तालुकाध्यक्षपदावरून हटवून शहरप्रमुख बनवले तरीही काम करण्याची जिद्द काही सोडली नाही. पक्ष वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले; परंतु काही नेत्यांच्या मर्जीत न बसल्यामुळे त्यांना काम करून दिले नाही. अखेर या सर्व राजकारणाला कंटाळून सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आपली उघड नाराजी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 31/Dec/2024