चिपळूण : आरोग्यदायी गाव या थीमखाली ग्रामपंचायत घाणेखुंटकडून विविध उपक्रम राबविले जातात व गाव सुदृढ व प्रदूषण मुक्त कसे ठेवता येईल, यासाठी प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने घाणेखुंट ग्रामपंचायत, दीपक फौंडेशनच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अत्याधुनिक मेडिकल मोबाईल युनिट व्हॅनमध्ये आलेल्या ग्रामस्थांचे ईसीजी, एक्सरे करण्यात आले. तसेच नेत्रतपासणी करून सर्वाना नंबरचे चष्मे मोफत वाटण्यात आले.
तसेच आजारांची विविध प्रकारच्या तपासणी विविध डॉक्टरांकडून करण्यात आली व तिथेच उपचार करून औषधे देण्यात आली. सरपंच राजू ठसाळे यांनी ग्रामस्थांना पौष्टिक आहार, नियमित व्यायाम व तणावमुक्त जीवनाचा कानमंत्र दिला. या आरोग्य शिबिरात एकूण ३२० ग्रामस्थांची तपासणी व उपचार करण्यात आले. हे शिबिर आयोजित केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 31/Dec/2024














