महापुरुषांच्या नावाचे पावित्र्य जपणे महत्त्वाचे : अॅड. अभिजित गांधी

मंडणगड : विद्यालयात गुणवत्तेबरोबर शिस्तप्रियताही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. महापुरुषांच्या नावाने हायस्कूल असल्यामुळे महापुरुषांच्या नावाचे पावित्र्य जपणे महत्त्वाचे आहे, असे सांगत संस्थेचे चिटणीस अॅड. अभिजित गांधी प्रशालेच्या गुणवत्तेबाबत कौतुक केले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मंडणगड तालुका विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. या प्रसंगी हायस्कूलची यशस्वी वाटचाल, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्रावीण्य याबाबत मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमाला मंडणगड तालुका विकास मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी, विजय मोरे, चिटणीस अॅड. अभिजित गांधी, माजी जि. प. सदस्य संतोष गोवळे, नगरपंचायत गटनेते विनोद जाधव, खजिनदार विलास मालुसरे, चिटणीस संतोष मांढरे, संचालक प्रसाद हेंद्रे, राकेश शिंदे, पराग लेंडे, मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, निवृत्त मुख्याध्यापक बी. जे. पाटील, पाटील, साहेबराव वाघमारे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 31/Dec/2024