रत्नागिरीत उद्यापासून २१ दिवसीय मोफत योग शिबिर

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण २१ दिवसांचा असून हे शिबिर १ ते २१ जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

इच्छुक नागरिकांनी https://forms.gle/asQ7baBQMbUtju9t9 या लिंकवर नोंदणी करावी. तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 31-12-2024