रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर शहाळी विक्रीचा व्यवसाय करताना मयेकर दांपत्याने आजवर एक रुपया ग्रामपंचायतीला व्यवसाय कर भरलेला नाही. ग्रामपंचायतीमध्ये ते मद्यधुंद अवस्थेत येतात. मी मुख्यमंत्र्यांना फोन करतो, असा दबाव टाकून आमच्यावर पैसे घेतल्याचा नाहक आरोप करत आहेत. त्यांनी हे आरोप सिद्ध करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करून अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल, असा इशारा गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पकये यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गणपतीपुळे येथील शरख मयेकर आणि आदिती मयेकर या दांपत्याने ग्रामंपचायत प्रशासनाविरोधात उपोषण सुरू केले होते. शरद मयेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांनी तात्पुरत उपोषण स्थगित केल्याचे स्पाष्ट केले, परंतु आता या उपोषणाबाबत ग्रामपंचायत आक्रमक झाली आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना सरपंच कल्पना पकये म्हणाल्या, माप्रतीपुळे समुद्रकिनारी २०२२ मध्ये शरद मयकेर यांनी व्यवसाय सुरू केला होता. तेव्हापासून मयेकर हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागतात. कोणताही सेवाकर भरत नाही. मद्यप्राशन करून धमक्या देतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची कारवाई केली होती तेव्हा ग्रामपंचायतीने चोरी केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात्त केली होती. व्यवसायाबाबत चौकशी करण्यासाठी ते येतात तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत असतात. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना फोन केला आहे अशा प्रकारे आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. उपोषण करतानाही त्यांनी नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीला नोटीस देणे आवश्यक होते; मात्र ती दिलेली नाही. ते महाद्य प्राशन करून येतात, त्याचे पुरावे ग्रामपंचायतीकडे आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 01/Jan/2025













