◼️सूरजचं पालकत्व घेतलं
पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक विनोदी अभिनेता आहे. हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम केलं आहे.
वेगवेगळी कॅरेक्टर्स करणारा हा माणूस स्वतःच एक कॅरेक्टर आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातदेखील त्याच्या या कॅरेक्टरने प्रेक्षकांची मने जिंकली.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वच सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते. त्यामुळे निक्की, सूरज या सदस्यांना कालच्या भागात सेफ करण्यात आलं. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ अंतिम टप्प्यात आलेला असताना या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अंकिता आणि पॅडी दादा या दोन सदस्यांमध्ये शेवटी चुरस रंगली. यापैकी अंकिताला ‘बिग बॉस’ने सेफ केलं. तर प्रेक्षकांनी दिलेल्या मतांचा मान ठेवत पंढरीनाथ कांबळेला या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागला. खरंतर ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून एक वेगळाच पॅडी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेत पंढरीनाथ कांबळे म्हणाले,”बिग बॉस मराठी’च्या घरातील माझ्या प्रवासाबद्दल मी खूप आनंदी आहे. आता मी बाहेर पडलो याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही आहे. मी कोणाला दुखावलं नाही, कोणाला उलट उत्तर दिलेलं नाही. प्रत्येक वेळेत मी माझे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत. घरातील प्रत्येकाचा मी आदर केला आहे. त्यामुळे आज निरोप घेताना मला अजिबातच दु:ख होत नाही आहे”.
पॅडी पुढे म्हणाला,”फिनालेपर्यंत यायची इच्छा होती. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना मी माझ्या पत्नीला खूप मीस केलं. पण आता बाहेर पडल्यानंतर मला सूरजची नक्कीच आठवण येईल. डीपी, अंकिताचीदेखील आठवण येईल. त्यांच्याबद्दल एक आत्मियता निर्माण झाली आहे. हे सर्व त्यांच्या मतांवर ठाम आहेत. मतांवर ठाम राहायला मला ‘बिग बॉस मराठी’च्या घराने शिकवलं”.
पॅडीने जाता जाता सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं
डॉ.निलेश साबळेने पॅडीला इन्व्हेस्टमेंट बॉक्ससाठी कोणाला नॉमिनी करायला आवडेल विचारताच पॅडीने सूरजचं नाव घेतलं. त्यानंतर पॅडी सूरजला म्हणाला की, “सूरज चव्हाण जो माझ्या सगळ्या गोष्टींचा नॉमिनी असेल. त्याने नॉमिनी न करता मी त्याचं पालकत्व आयुष्यभरासाठी घेतलंय.” असं महत्वाचं वाक्य पॅडी सूरजसाठी म्हणाला. पुढे घरात आल्यावर पॅडी आणि सूरजने एकमेकांना मिठी मारली. दोघांच्या डोळ्यात पाणी नसलं तरीही ते एकमेकांसाठी भावुक झालेले दिसले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 30-09-2024