◾ येत्या काही दिवसात रत्नागिरी खबरदारचे न्यूज न्यूज अॅप गुगल प्ले स्टोअर्स वर उपलब्ध होणार
➡️ रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरी खबरदार च्या वाचकांच्या संखेत दिवसेंदिवस भर पडत आहे. २०१३ पासून एक दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्तपत्र म्हणून रत्नागिरी खबरदार आपले नाव टिकवून आहे.
म्हणूनच कोकणातील लाखो वाचक रत्नागिरी खबरदार सोबत कनेक्ट आहेत. यावर आता गुगल ने देखील शिक्कामोर्तब केले आहे. त्या त्या प्रदेशातील सर्वात जास्त वाचल्या जाणाऱ्या बातम्या गुगल आपल्या डिस्कव्हर पेज ला प्रसिद्ध करीत असते.
रत्नागिरीशी सबंधित असणाऱ्या वाचकांना या बातम्या गुगल आपल्या पेज द्वारे दाखवते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या संपूर्ण कोकण पट्यातून केवळ रत्नागिरी खबरदारच्याच बातम्या सर्वात जास्त प्रमाणात गुगल डिस्कव्हर प्रसिद्ध करते. गुगल सारखी जगविख्यात कंपनी देखील रत्नागिरी खबरदारच्या कंटेंटवर विश्वास ठेवते हे अभिमानास्पद आहे असे मत रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु यांनी व्यक्त केलंय. दिवसेंदिवस लाखोंच्या पटीने वाढत जात असणारी संख्या पाहून लवकरच रत्नागिरी खबरदारचे न्यूज अॅप गुगल प्ले स्टोअर्स वर वाचकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देखील हेमंत वणजु यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाचकांना दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 01-01-2025














