रस्त्याच्या विरुध्द दिशेला गाडी चालवून दुचाकीला धडक; बोलेरो चालकावर गुन्हा

रत्नागिरी : बेदरकारपणे बोलेरो कॅम्पर गाडी चालवून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना रविवार २९ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. सुमारास जयगड ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावर घडली. राजेंद्र तुकाराम बैकर (५५, रा. चाफेरी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोलेरो चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात विनायक चद्रकांत चौघुले (४०, रा. वरवडे, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री हर्ष रविंद्र चौघुले (२१) आणि प्रितेश दत्ताराम भाताडे (२६, दोन्ही रा. वरवडे, रत्नागिरी) हे दुचाकी (एमएच-०८-एयू-९३२३) वरुन जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये कामावर जात होते. त्याच सुमारास राजेंद्र बैकर हा आपल्या ताब्याती बोलेरो (एमएच-०८-एपी-११४८) घेउन भरधाव वेगाने समोरुन येत असताना त्याने रस्त्याच्यास विरुध्द दिशेला जात या दुचाकीला समोरुन धडक देत हा अपघात केला. यात दुचाकीवरील दोघांनाही दुखापत झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 01/Jan/2025