नवीन शैक्षणिक धोरणावर ‘गोगटे’त कार्यशाळा

रत्नागिरी : नवीन शैक्षणिक धोरण-२०२० नुसार मुंबई विद्यापीठातर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) आज (ता. ३०) आणि मंगळवारी (१ ऑक्टोबर) कला आणि विज्ञान शाखेसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत रत्नागिरी आणि सिंधुगुर्ग जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

कला शाखेतील भाषा आणि सामाजिक शास्त्र अंतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, ग्रामीण विकास, प्रसार मध्यम, राष्ट्रीय सेवा योजना आणि भूगोल या विषयांच्या अभ्या समंडळातील विषयतज्ज्ञ आज मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, माहिती-तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयांच्या अभ्यासमंडळातील विषयतज्ज्ञ महाविद्यालयीन स्तरावरील संबंधित करतील. प्राध्यापकांना मार्गदर्शन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) राधाबाई शेट्ये सभागृहात उद्घाटन होईल.

कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 30-09-2024