Cabinet Meeting : खातेवाटपानंतर फडणवीस सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक, ‘या’ विशेष मुद्द्यांवर होणार चर्चा

Maharashtra News:  नव्या सरकारची नव्या वर्षाची पहिली बैठक आज (गुरुवारी) होणार आहे. खातेवाटप झाल्यानंतर मुंबईत होणारी ही पहिलीच बैठक असेल. दुपारी १२ वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समोर आलेय. खातेवाटप होऊ आठवडा झाला तरीही काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या राज्याबाहेर असल्याचं समजतेय, त्यामुळे ते बैठकीला गैरहजर राहणार असल्याचे समजतेय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आजच्या बैठकीत काही चर्चा होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांचं नाव यामध्ये आल्यामुळे बैठकीत काही निर्णय होणार का? याचीही चर्चा सुरू आहे.

खातेवाटपानंतर ही पहिलीच बैठक असेल. सर्व मंत्र्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खातेवाटपानंतरही अद्याप काही नेत्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आलेय. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय होणार? याची चर्चा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 02-01-2025