मुंबई : Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं.
ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत, असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलं.
आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या. आधार कार्ड मिस मॅचच्या तक्रारी आल्या होत्या. ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहोत, असं देखील त्या म्हणाल्या.
शासन निर्णयात बदल होणार नाही : आदिती तटकरे
Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत. काही महिलांकडून ऑनलाइन अर्ज आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झालं असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. चारचाकी वाहनं ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल, असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या. आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
कोणत्या अर्जांची पडताळणी होणार?
1) ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार स्क्रुटिनी
2) चार चाकी वाहनं असलेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी
3) एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार स्कुटीनी
4) लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी
5) आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
दरम्यान अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाभार्थी महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा त्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत, अशा महिलांना आता या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका हा राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 02-01-2025