रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)ची बैठक संपन्न

◼️ सर्वसामान्यांसाठी योजना राबवण्यात अधिकाऱ्यांनी तरबेज व्हावे : खा. नारायण राणे

◼️ शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा : खा. सुनील तटकरे

रत्नागिरी : महाराष्ट्रात एक अग्रेसर जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे.

त्यामुळे सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी निगडित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या योजना पोहोचविल्या पाहिजेत. यामध्ये कोणताही हजगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देतानाच दिशा समितीच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीसा बजावून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे व सहअध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. शेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचा परतावा देताना टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करा, असे आदेश यावेळी अध्यक्ष तटकरे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले. तर सर्वसामान्यांसाठी योजना राबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामकाजात तरबेज व्हावे असे सह अध्यक्ष खा. राणे यांनी सुचना केल्या.

तर या बैठकीला अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग कामाबाबत आढावा घेण्याचा महत्त्वपूर्ण विषय अजेंड्यावर असताना या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. यावर अध्यक्ष खा. तटकरे व खा. राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणी थेट लोकसभा अध्यक्ष व लोकसभा सचिवाकडे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव पाठवा असे आदेश जिल्हाधिकारी यांना दिला. अशा प्रकारे अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी तटकरे व राणे यांनी दिला.

रत्नागिरीजिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)ची बैठक गुरूवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभीच समितीचे सह उपाध्यक्ष खा. राणे यांनी बैठकीसाठी देण्यात आलेल्या अहवालातील त्रुटींवर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली. बैठकीत अहवाल देताना तो परिपूर्ण असावा, असे नमूद करत अहवालात प्रगतीपथावर हा शब्द काढून टाका आणि किती टक्के काम झाले असे असले पाहिजे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

याप्रसंगी बोलताना खा. राणे यांनी केंद्र व राज्याच्या योजना या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अशा योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा व तो मिळवून देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. ती त्यांनी प्रामािणकपणे पार पाडली पाहिजे. कोकणातील जनता आमच्यावर प्रेम करते, या प्रेमाचे रुपांतर विकासातून दिसले पाहिजे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात भरीव काम करणे आवश्यक आहे, असेही खा. राणे यांनी यावेळी नमूद केले. यावेळी कृषी आिण सिचंन िवभागाच्या आढावा प्रसंगी अध्यक्ष खा. तटकरे व सहअध्यक्ष खा. राणे यांनी नाराजी व्यक्त केली.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीविषयक योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना िदला पाहिजे. उत्पादन वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आिण उपाययोजना केल्या पाहिजेत आिण त्यासाठी िजल्ह्याचा िवस्तृत आराखडा तयार केला पाहिजे. तर िसंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सेवासुविधा देण्यासाठी कसे िनयोजन करता येईल याबाबतही प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे असेही खा. राणे यांनी नमूद केले.

िजल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी िपक िवमा घेतलेला असून िवम्याचा हप्ता भरलेला आहे. मात्र, पत्यक्षात नुकसानभरपाई देताना िवमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून अशा प्रकारे िवम्याचा हप्ता घेऊन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या िवमा कंपन्यांिवरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, अशा आदेश खा. तटकरे यांनी िजल्हािधकारी एम. देवेंदर सिंह व िजल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना िदला. आवश्यकता असल्यास यासाठी माझ्या नावाची तक्रार घ्या. पण शेतकऱ्यांवरील अन्याय आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी िदला.

कोकण रेल्वेवरील िवषयांवर चर्चा करताना कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अहवालावरही खा. तटकरे व खा. राणे यांनी नाराजी व्यक्त केली. कोकण रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडे असलेले बजेट आवश्यक असलेल्या सेवा सुविधा याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, आपण िनरंक अहवाल िदला आहे, असे नमूद करत खा. राणे यांनी कोकण रेल्वेबाबत कोकण रेल्वेच्या अिधकाऱ्यांशी स्वतंत्र बैठक आयोजित करून आढावा घेण्याचे िनश्चित केले. तर याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशीही आपण चर्चा करू, असे नमूद केले.

यावेळी राजापूरचे आमदार िकरण सामंत यांनी राजापूर िवधानसभा मतदार संघात एकूण ७ रेल्वेस्थानके आहेत. मात्र, यािठकाणी सेवासुविधांचा मोठा अभाव आहे. राजापूर रेल्वे स्थानकात िलफ्टची मागणी असून अद्याप ती पूर्ण झालेली नाही तर एक्स्प्रेस गाड्यांना थांबे िमळण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना स्थानकावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी योग्य प्रकारे दळणवळणाची सोय नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे नमूद केले. याबाबतही काय कार्यवाही आवश्यक आहे याचा अहवाल सादर करण्याचे िनर्देश खा. तटकरे व राणे यांनी िदले. यावेळी िचपळूणचे आमदार शेखर िनकम यांनी दाभोळ ते पेढे या नॅशनल वॉटर रोडचे काम मार्गी लावण्याबाबतची मागणी केली.

खासदार श्री. तटकरे म्हणाले, दिव्यांगांच्या तसेच वयोश्री योजनेकडे अधिक लक्ष द्यायला हवी. तसेच तालुकानिहाय लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती तसेच सद्यस्थिती याची माहिती हवी. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य शिबिर घेण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. शेतीसाठी सौरऊर्जेबाबत येथील भौगोलिक स्थिती वरिष्ठांना सांगावी. यांत्रिकरणाची योजना पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन सखोल काम करावे.

बीएसएनएलच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करुन ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत त्यांनी सूचना केली. जलपर्यटन सुरु करण्याबाबत सूचना करुन खासदार श्री. तटकरे म्हणाले, जिल्ह्यात मायनिंग कुठे कुठे आहे, त्यामधून उत्पन्न किती होत आहे, याबाबतची माहिती द्यावी. पर्यटनाशी निगडित प्रशिक्षण देण्याबाबत कौशल्य विकास विभागाने आराखडा तयार करावा. परंपरागत व्यवसाय, पर्यटन याची सांगड घालून बचत गटांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधील दर्जेदार कामे करा. अधिकाऱ्यांनी कसोशीने लक्ष घालून अधिक दक्षतेने काम करावे. कृषी, पर्यटन, फलोत्पादन अधिक क्षेत्रांमध्ये मोठा वाव आहे. सामाजिक समानता अतिशय उत्तम राखणारे मुलींचे चांगले प्रमाण आहे. सिंधुरत्न योजनेमधूनही चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अधिक दक्षतेने अधिकाऱ्यांनी काम करावे, असेही ते म्हणाले.

खासदार श्री. राणे म्हणाले, निर्यात वाढण्यासाठी कोणते उत्पादने आहेत, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. शेतीमधील नवे तंत्रज्ञान, खते, पाणी याबाबतचे नियोजन आदींबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जिल्ह्याचे पर्यायाने राज्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलून काम करावे. पर्यटन वाढीसाठी पर्यटकांसाठी सुविधा वाढवायला हव्यात. उद्योग, व्यवसायासाठी मार्केटींगच्या पध्दती, ग्राहकांना काय हवे याबाबतचे मार्गदर्शन करायला हवे. प्रत्येक योजनांमध्ये लाभार्थ्यांचा आकडा वाढायला हवा. या योजना गरीबांना मिळण्यासाठी प्रमाणिकपणे काम करा. भ्रष्टाचार झाल्यास अशा अधिकाऱ्यास जाग्यावर निलंबित करा. जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी बुध्दीमत्तेला प्रमाणिकपणाची जोड द्यावी. उद्दिष्टापेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बक्षीस द्या.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी हाऊस बोट प्रकल्प, टुरिस्टबोट प्रकल्पाबाबत माहिती दिली. बैठकीला समिती सदस्य नेहा जाधव, सतीश दिवेकर, शेखर उकार्डे, संदीप बांदकर, सुरेश सावंत, सखाराम कदम आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 02-01-2025