पाली – तुतारी एक्सप्रेस मधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. 2) सकाळी घडली. ओमकार राऊत (वय.24) राहणार देवगड सिंधुदुर्ग असे या तरुणाचे नाव आहे.
पहाटे साडेतीन च्या सुमारास मुंबईहून रत्नागिरी च्या दिशेने जात असताना रोहा व कोलाडच्या दरम्यान तुतारी एक्सप्रेस मधून पडून हा अपघात झाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी ही माहिती माणगाव आरपीएफ यांना दिली.
माहिती मिळताच रोहा पोलीस व बाहे गावाचे पोलीस पाटील व SVRSS टीम घटनास्थळी पोहोचले. पडलेल्या तरुणाला गंभीर दुखापत होती. त्याला तातडीने रोहा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करता येण्यात आले. गंभीर दुखापत असल्याकारणाने पुढील उपचाराकरिता पनवेल-कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.














