खेड येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

खेड : तालुक्यातील आपेडे गावातील म्हापर्लेवाडीतील तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश दामू म्हापार्ले असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. लंबाडेवाडी ते उधळे कदमवाडी अशा पायवाटेने पायी चालत येत असताना त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर सपनि दंश केल्याने त्याला उपचारार्थ कळंबणी बुद्रुक येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची खबर कळंबणी बुद्रुक येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी येथील पोलिस ठाण्यात दाखल केली. त्याप्रमाणे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.