रत्नागिरी : राजिवडा येथे मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

रत्नागिरी : मोठ्याने बोलल्याच्या रागातून रॉडने डोक्यात मारून दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बुटियाँ (पूर्ण पत्ता माहिती नाही) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३१ डिसेंबरला रात्री राजीवडा पुलाखाली झोपडपट्टी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय शंकर गवळी (वय ३९, रा. राजिवडा पुलाखाली झोपडपट्टी, रत्नागिरी) हे त्याचे मित्र रवी यांच्याशी मसाल्याच्या व्यापारासंबंधी देवाण-घेवाण करण्याबाबत मोठ्या आवाजात बोलत होते. त्यावेळी मोठ्याने कशाला बोलतोस ? आवाज कमी कर, असे संशयिताने सांगितले. त्यावर आम्ही कामानिमित्त बोलतोय, असे सांगितले. याचा राग मनात धरून संशयित बुटियाँ याने जवळच पडलेला रॉड फिर्यादी गवळी यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी गवळी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.