Walmik karad Live News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाने सीआयडी कोठडी सुनावली आहे. अशातच आता त्याने कोठडीत 24 अस्टिटंट पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान, काल विरोधकांनी कराड ज्या पोलिस कोठडीत आहे. त्याच पोलिस स्टेशनमध्ये पाच नवीन बेड का मागवले? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांवर शंका उपस्थित केली आहे. अशातच आता वाल्मिक कराडने (Walmik karad) आपल्याला तुरूंगात एक मदतनीस मिळावा अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
यासाठी त्याने एक याचिका केली असून त्यामध्ये त्याने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा करत एक मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे. कराडने केलेल्या या मागणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यभरात वाल्मिक कराड याच्या अटकेची मागणी केली जात होती.
तर वाल्मिक कराडच या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप देखील विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांकडून केला जात होता. त्यानंतर माझ्यावर खंडणीच्या गुन्हात गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मी सरेंडर होत असल्याचं सांगत वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात पोलिसांना (Pune Police) शरण आला. त्यानंतर न्यायालयाने त्याला 15 दिवसाच्या सीआयडी कोठडीत सुनावली.














