आता काश्मीरचंही नाव बदलणार?; अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण!

भारतात अनेक शहरांच्या नावांमध्ये बदल केला गेला आहे आणि होतही आहे. त्यात आता काश्मीरच्या नावाचीही भर पडण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण, आहे गृहमंत्री अमित शाह यांचं एक वक्तव्य. गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्याने याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
गुरुवारी गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी म्हटले की, मला आनंद आहे की आज काश्मीर पुन्हा एकदा आपल्या भूसांस्कृतिक राष्ट्र भारताचा अभिन्न अंग बनून भारतासोबत विकासाच्या मार्गावर आहे. या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित झाली आहे. शाह यांनी सांगितले की, मला विश्वास आहे की जे काही आम्ही गमावले, ते आम्ही लवकरच मिळवू. शाह यांनी ‘जम्मू-कश्मीर एंव लद्दाख: सातत्य और सम्बद्धता का ऐतिहासिक वृतांत’ पुस्तक प्रकाशनावेळी महिर्षि कश्यप यांचा उल्लेख केला.

अमित शाह नेमकं काय म्हणाले? –
गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, काश्मीर भारताच भाग होता, आहे आणि राहील. तो वेगळा करण्याचा प्रयत्न काहींनी केला होता, परंतु ती अडचणही दूर केली आहे. इतिहास लुटियंस दिल्लीत बसून नाही लिहिला जात, तो तिथे जाऊन समजून घ्यावा लागतो. शासकांना खूश करण्यासाठी इतिहास लिहिण्याचा काळ गेला आहे. तसेच, मी भारतातील इतिहासकारांना आवाहन करतो की, प्रमाणाच्या आधारावर इतिहास लिहा. पुढे अमित शाह म्हणाले, अम्ही जाणतो की काश्मीरला कश्यपांच्या भूमीच्या नावाने ओळखले जाते, कदाचित असं असू शकतं की त्यांच्या नावावरूनच काश्मीर नाव पडलं असेल. असंही ते म्हणाले.